अमृतसरमधील सुवर्ण मंदिराजवळील ‘हेरिटेज स्ट्रीट’वर पुन्हा स्फोट !
अमृतसर – येथील प्रसिद्ध सुवर्ण मंदिराजवळील ‘हेरिटेज स्ट्रीट’वर ८ मे या दिवशी सकाळी ६ वाजता पुन्हा स्फोट झाला. सकाळची वेळ असल्याने या मार्गावर कुणीही नसल्याने जीवीतहानी टळली. गेल्या ३२ घंट्यांमध्ये स्फोट होण्याची ही दुसरी घटना आहे. विशेष म्हणजे दोन्ही स्फोट एकाच ठिकाणी झाले.
Another explosion at Heritage Street near #Amritsar's #GoldenTemple leaves several injured#Punjab | #DNAVideos
For more videos, click here https://t.co/6ddeGFqM3o pic.twitter.com/a9Ukg8K5DO
— DNA (@dna) May 8, 2023
या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही. सकाळी स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आयुक्त नौनिहाल सिंह यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पहाणी केली. यानंतर अमृतसर पोलिसांचे बाँबशोधक पथक आणि न्यायवैद्यक विभागाचे पथक यांनीही घटनास्थळी पहाणी केली. पहिल्या स्फोटात वाहनतळाच्या काचा फुटल्याने ५ – ६ भाविक घायाळ झाले होते.