सनातनचे १६ वे संत पू. दत्तात्रेय देशपांडे यांचा देहत्याग !
देवद (पनवेल), ७ मे (वार्ता.) – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती शरणागत आणि कृतज्ञताभाव असणारे, तत्त्वनिष्ठ, तसेच भगवंताच्या अखंड अनुसंधानात असणारे सनातन संस्थेचे १६ वे संत पू. दत्तात्रेय देशपांडे (वय ८८ वर्षे) यांनी ७ मे या दिवशी सकाळी १०.१५ वाजता येथील सनातनच्या आश्रमात देहत्याग केला. वृद्धापकाळामुळे ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती विजया, ३ मुली, २ जावई, ५ नातवंडे आणि १ पणतू, असा परिवार आहे. सनातन परिवार देशपांडे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. चैत्र कृष्ण चतुर्दशी म्हणजेच २० एप्रिल २०१२ या दिवशी ते संतपदी विराजमान झाले होते. ते मूळचे कर्नाटक येथील असून वर्ष २०१३ पासून येथील सनातनच्या आश्रमात त्यांचे वास्तव्य होते.