‘द केरल स्टोरी’ चित्रपट करमुक्त करा ! – भाजप सांस्कृतिक आघाडी
मिरज – ‘लव्ह जिहाद’चे वास्तव मांडणारा ‘द केरल स्टोरी’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा, तसेच हा चित्रपट जिथे जिथे प्रदर्शित झाला आहे, तिथे तिथे चित्रपटगृहांना संरक्षण मिळावे, अशा मागणीचे निवेदन भाजप सांस्कृतिक आघाडीच्या वतीने मिरज तहसीलदार यांना देण्यात आले. या निवेदनावर प्रदेश उपाध्यक्ष ओंकार शुक्ल, जिल्हाध्यक्ष अपर्णा गोसावी, रश्मी सावंत आणि अन्य यांच्या स्वाक्षर्या आहेत.