श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने महिलांसाठी ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे आयोजन !
सांगली – ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून महिलांना वस्तूस्थिती समजावी, तसेच या चित्रपटास होणार्या विरोधास प्रत्युत्तर म्हणून ६ मे या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने महिलांसाठी विजयनगर येथील ‘ऑरम’ चित्रपटगृहात ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते. हा चित्रपट महिलांना विनामूल्य दाखवण्यात आला. या उपक्रमासाठी ‘ऑरम’ चित्रपटगृहाचे व्यवस्थापक चिंतामणी कलगुटगी यांचे सहकार्य लाभले. मिरज विभागाचे कल्याण आंधळे, शुभम येवारे, गुरू शेगाव, रोहित दंडवडे, गुंडा दंडवडे, सुशांत घाटे, शुभम दंडवदे यांसह अन्य कार्यकर्त्यांनी या नियोजनात पुढाकार घेतला.
या संदर्भात श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक श्री. नितीन चौगुले म्हणाले, ‘‘आपल्या भागामध्ये महिला आणि मुली यांच्यामध्ये जागृती होण्यासाठी हा खेळ दाखवण्यात आला. हा चित्रपट संघटनेच्या माध्यमातून राज्यभर अनेक जिल्ह्यांमध्ये दाखवण्यात येणार आहे.’’