‘लव्ह जिहाद’ हे तर हिंदु अन् ख्रिस्ती महिलांच्या गर्भावरील आतंकवादी आक्रमण ! – प्रशांत संबरगी, चित्रपट निर्माते
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘द केरल स्टोरी : लव्ह जिहादपासून इसिसपर्यंत !’
मुंबई – ‘लोकसंख्या वाढ’, ‘लँड (भूमी) जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ ही इस्लामी राष्ट्र निर्मितीसाठीची ध्येय-धोरणे आहेत. साम्यवादी आणि पश्चिमी प्रसारमाध्यमे याला ‘काल्पनिक कथा’ म्हणतात; मात्र ‘द केरल स्टोरी’ हे एक कटूसत्य असून ‘लव्ह जिहाद’ हे हिंदु-ख्रिस्ती महिलांच्या गर्भावरील आतंकवादी आक्रमण आहे, असे परखड मत कर्नाटकातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्री. प्रशांत संबरगी यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘द केरल स्टोरी : लव्ह जिहादपासून इसिसपर्यंत !’, या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.
काँग्रेस आणि साम्यवादी पक्षांकडून ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला होणारा विरोध हा दुटप्पीपणा ! – कु. प्रतीक्षा कोरगांवकर, ‘रणरागिणी’ शाखा, हिंदु जनजागृती समिती
एकीकडे काँग्रेस आणि साम्यवादी पक्ष ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्रात काँग्रेसचेच सरकार सत्तेत असतांना वर्ष २०११ मध्ये एक परिपत्रक काढून ‘लव्ह जिहाद’विषयी माहिती गोळा करण्यास सांगते, तसेच ‘लव्ह जिहाद’चे २२ गुन्हे नोंदवल्याची माहिती ‘माहितीच्या अधिकारा’च्या अंतर्गत दिली जाते. केरळचे कम्युनिस्ट पक्षाचे तत्कालीन मुख्यमंत्री व्ही.एस्. अच्युतानंदन यांनी वर्ष २०१० मध्ये थेट देहलीत पत्रकार परिषद घेऊन ‘येत्या २० वर्षांत केरळला ‘इस्लामिक स्टेट’ बनवण्यासाठीचे षड्यंत्र रचले जात आहे’, अशी माहिती दिली होती. ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी नुकतेच ‘पाकिस्तानी वंशाची मुले ‘इस्लामिक ग्रूमिंग गँग’द्वारे तेथील ख्रिस्ती मुलींना लक्ष्य करत आहेत’, असे म्हटले आहे. स्वीडन देशानेही ‘द केरला स्टोरी’प्रमाणे त्यांच्या देशातील महिलांवर ‘इसिस’च्या आतंकवाद्यांनी केलेल्या भीषण अत्याचारावर मालिका बनवली होती आणि तिच्या जनजागृतीसाठी प्रोत्साहन दिले होते.
काश्मीरमधील आतंकवादात पाकिस्तान, तर ‘लव्ह जिहाद’मध्ये ‘सौदी’ आणि ‘सीरिया’ यांसारखे देश सहभागी ! – प्रशांत संबरगीवर्ष २०१९ मध्ये ‘हलाला’ (तलाक दिल्यानंतर पुन्हा त्याच पतीशी विवाह करण्यापूर्वी दुसर्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवणे) प्रथेवर आधारित ‘हलाला अ कर्स’ नामक चित्रपटालाही काँग्रेसने विरोध केला; मात्र चित्रपट निर्मात्याने ‘हलाला प्रथे’चे भीषण सत्य न्यायालयासमोर सिद्ध केल्यामुळे काँग्रेसचा विरोध फोल ठरला. वर्ष २०१० मध्ये केरळ उच्च न्यायालयातही ‘लव्ह जिहाद’चे सत्य समोर आले. हे रोखण्यासाठी सरकारने आंतरधर्मीय विवाहावर निर्बंध आणणे आवश्यक आहे. याच आधारावर ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट बनवण्यात आला आहे. काश्मीरमधील आतंकवादात पाकिस्तान सहभागी आहे, तर केरळमधील आतंकवाद हा ‘लव्ह जिहाद’ हा ‘सॉफ्ट टेरेरिझम’चा भाग असून ‘सौदी’ आणि ‘सीरिया’ यांसारखे देश यामागे आहेत. |