गडहिंग्लज येथे आज ‘श्री महालक्ष्मी यात्रा समिती’च्या वतीने श्री महालक्ष्मीदेवीची नगरप्रदक्षिणा !
गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) – ‘श्री महालक्ष्मी यात्रा समिती’ गडहिंग्लजच्या वतीने सोमवार, ८ मे या दिवशी दुपारी ४ वाजता श्री महालक्ष्मीदेवीची चांदीची पालखी आणि कळस यांची हिरण्यकेशी नदीघाटापासून मंगलकलश अन् सवाद्य मिरवणुकीने नगरप्रदक्षिणा होणार आहे. या प्रसंगी ‘सिद्ध संस्थान मठा’चे पू. शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते पालखी आणि कलशपूजन होईल. रात्री ९ वाजता मंदिर आवारात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘श्री महालक्ष्मी यात्रा समिती’च्या वतीने करण्यात आले आहे.