हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधात संपूर्ण देशभर जनजागृती मोहीम राबवू ! – गुप्तेश्वर पांडे, माजी पोलीस महासंचालक, बिहार
वाराणसी (उत्तरप्रदेश) – बिहार राज्याचे माजी पोलीस महासंचालक आणि सुप्रसिद्ध कथाकार श्री. गुप्तेश्वर पांडे यांची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भेट घेण्यात आली. या वेळी त्यांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समिती करत असलेल्या कार्याची माहिती देण्यात आली, तसेच हलाल अर्थव्यवस्थेच्या भीषण संकटाविषयी अवगत करण्यात आले. श्री. पांडे यांनी विषय ऐकल्यानंतर समितीच्या कार्याचे कौतुक केले आणि ‘हलाल जिहादच्या विरोधात सर्वत्र जनजागृती मोहीम राबवू’, असे आश्वासन दिले. या वेळी समितीने प्रकाशित केलेला ‘हलाल जिहाद ?’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ त्यांना भेट म्हणून देण्यात आला. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी, श्री. नीलय पाठक आणि सनातन संस्थेच्या सौ. सानिका सिंह उपस्थित होत्या.