नागपूर येथे ११ लाख रुपये शाळा शुल्काची लिपिकाकडून अफरातफर !
पसार लिपिकाचा शोध चालू !
नागपूर – पालक आणि विद्यार्थी यांनी दिलेले ११ लाख १३ सहस्र १७० रुपयांचे शुल्क एका शाळेत जमा न करता त्याची परस्परकरणार्या शाळेच्या लिपिका स्नेहा अंबर्ते उपाख्य स्नेहा खराते (वय ३४ वर्षे) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शाळेचे अध्यक्ष संजय पेंढारकर यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती. तक्रार प्रविष्ट झाल्यानंतर खराते पसार झाल्या असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
संपादकीय भूमिका :-पैशांसाठी हपापलेल्या अशांना कठोर शिक्षाच करायला हवी ! |