पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची महंमद पैगंबर यांच्याशी तुलना करणार्याला जमावाने केले ठार !
इम्रान खान यांच्या पक्षाच्या सभेत घडला प्रकार !
पेशावर (पाकिस्तान) – पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची महंमद पैगंबर यांच्याशी तुलना केल्यावरून जमावाने मौलाना (इस्लामचा अभ्यासक) निगार आलम याला अमानुष मारहाण करून ठार केले. इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’ या पक्षाच्या सभेमध्ये या मौलानाने ही तुलना केल्यावर या सभेमध्येच त्याला ठार करण्यात आले.
पाकिस्तान में ईशनिंदा के आरोप में भीड़ ने एक मुस्लिम स्कॉलर की पीट-पीट कर हत्या कर दी. मृतक इमरान खान का समर्थक था. उसकी उम्र 40 वर्ष है-#Pakistan #MobLynching #Blasphemyhttps://t.co/q33LOhzvLg
— ABP News (@ABPNews) May 7, 2023
या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात जमाव मौलाना निगार आलम याच्यावर दगडफेक करतांना दिसत आहे. आलम यांच्या मृत्यूनंतर जमाव त्यांचा मृतदेह ओढतांनाही दिसत आहेत.
संपादकीय भूमिका
|