पूर्व किनारपट्टीवर येणार ‘मोचा’ नावाचे चक्रीवादळ !

चक्रीवादळ

नवी देहली – बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ नावाचे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या चक्रीवादळामुळे केवळ देशाच्या पूर्व भागातच पाऊस पडणार असे नाही, तर मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगड आणि  झारखंड राज्यांमध्ये पुढील ४ दिवस हवामान खराब रहाणार आहे. या काळात मासेमार्‍यांना समुद्रामध्ये न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच बंगाल, ओडिशा आणि आंध्रप्रदेश राज्यांत राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि इतर यंत्रण यांना सज्ज रहाण्यास सांगण्यात आले आहे.

येमेन या देशाने या वादळाला ‘मोचा’ असे नाव दिले आहे. ‘मोचा’ हे येमेनमधील शहर आहे. हे शहर कॉफीच्या व्यापारासाठी ओळखले जाते.