पू. गोळवलकरगुरुजी यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणार्यांच्या विरोधात नगर येथे गुन्हा नोंद !
नगर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पू. गोळवलकरगुरुजी यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करून ते ‘व्हॉट्सॲप’द्वारे प्रसारित केल्याप्रकरणी नगर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी योगेश सूर्यवंशी यांनी ६ मे या दिवशी तक्रार प्रविष्ट केली असून संगमनेर पोलीस ठाण्यात आक्षेपार्ह लिखाण करणार्या हरिभाऊ सोळंखे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारदार योगेश सूर्यवंशी यांना ‘व्हॉट्सॲप’च्या एका गटात सोळंखे यांनी पोस्ट केलेले आक्षेपार्ह लिखाण वाचनात आले होते.