सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर अधिक कष्ट न होता मुतखडा लघवीतून बाहेर पडणे !
१. मुतखड्याच्या वेदना चालू होणे आणि औषधोपचार करूनही वेदना न थांबणे
‘१०.३.२०२३ या दिवशी मला मुतखड्याचा त्रास चालू झाला. माझ्या शरिराच्या उजव्या बाजूला पुष्कळ वेदना झाल्या. ३ घंट्यांनंतर वेदना थांबल्या. १७.३.२०२३ या दिवशी मला पुन्हा वेदना होऊ लागल्या आणि मुतखडा एका जागी येऊन अडकला. औषधोपचार घेऊनही मुतखडा तिथून पुढे सरकत नव्हता. तो तिथेच अडकल्यामुळे मला वेदना होत होत्या.
२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मुतखड्याचा त्रास उणावण्यासाठी नामजपादी उपाय सांगणे, ते केल्यावर मुतखडा लघवीतून बाहेर पडणे
२०.३.२०२३ या दिवशी मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना मुतखड्याचा त्रास उणावण्यासाठी नामजपादी उपाय विचारून घेतले. ते उपाय चालू केल्यानंतर मला लगेच वेदना चालू झाल्या आणि मुतखडा खालच्या दिशेने उतरू लागला. विशेष म्हणजे तो २४ घंट्यांच्या आत लघवीच्या वाटेवर पोचला. मी नामजपाचे उपाय चालूच ठेवले होते. २४.३.२०२३ या दिवशी मुतखडा लघवीतून बाहेर पडला.
३. आध्यात्मिक उपायांमध्ये असलेल्या सामर्थ्याची जाणीव होणे
मी स्वतः एक आधुनिक वैद्य असूनही असे सांगू शकतो की, ‘नामजपादी उपायातील सामर्थ्यामुळे नामजपाला आरंभ केल्यानंतर मला वेदना चालू झाल्या आणि अल्प कालावधीमध्ये अधिक कष्ट न होता मुतखडा बाहेर पडला.’
असे सामर्थ्य असलेले नामजपादी उपाय आम्हाला दिल्यासाठी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– आधुनिक वैद्य मनोज सोलंकी, मडगाव, गोवा. (२६.३.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |