गुरुगीतेतून वर्णिलेले श्री गुरुमाहात्म्य आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेला त्याचा भावार्थ !
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
साधकांना ‘गुरुभक्ती’ आणि ‘गुरुसेवा’ करण्याची संधी देऊन त्यांना हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या अवतारी कार्यात सहभागी करून घेणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः ।
तत्त्वं ज्ञानात्परं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः ।। – गुरुगीता, श्लोक ७४
अर्थ : श्री गुरुतत्त्वाहून श्रेष्ठ अन्य कुठलेही तत्त्व नाही. गुरुभक्ती आणि गुरुसेवा यांहून श्रेष्ठ असे दुसरे तप नाही. गुरुतत्त्वाच्या ज्ञानापेक्षा दुसरे कुठलेही ज्ञान श्रेष्ठ नाही. अशा श्रेष्ठ श्री गुरूंना नमस्कार असो.’
भावार्थ : ‘सनातनच्या साधकांच्या जीवनात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यापेक्षा श्रेष्ठ असे काहीही नाही. गुरुदेवांनी साधकांच्या अंतरातील भक्तीबीज फुलवून त्यांना ‘गुरुभक्ती’ आणि ‘गुरुसेवा’ करण्याची अनमोल संधी प्राप्त करून दिली आहे. त्यांनी हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या दिव्य अवतारी कार्यात साधकांना सहभागी करून घेतले आहे. साधकांसाठी ‘गुरुभक्ती’ आणि ‘गुरुसेवा’ यांहून मोठे तप नाही. साधकांना त्यांच्या उद्धारासाठी अशा तपाचे श्रेष्ठ वरदान देणार्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः नमन !
‘हे गुरुदेवा, आपणच आमच्याकडून ‘गुरुभक्ती’ आणि ‘गुरुसेवा’ रूपी श्रेष्ठ तप करवून घ्या’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
(७.५.२०२३)