(म्हणे) ‘देशात धार्मिक दंगली घडवण्याचा प्रयत्न चालू आहे !’
‘द केरल स्टोरी’वरून जितेंद्र आव्हाड यांची पोटदुखी !
मुंबई – केरळमधील कासरगोड येथील अब्दुल्ला आणि त्याची पत्नी खदिजा यांनी १० वर्षांच्या हिंदु मुलीला दत्तक घेतले. या मुलीने तिचे पालक गमावले होते. ती आता २२ वर्षांची आहे. अब्दुल्ला आणि त्याची पत्नी खदिजा यांनी तिचे लग्न एका हिंदु मुलाशी हिंदु रितीरिवाजानुसार लावून दिले.
केरळमधील कासरगोड येथील अब्दुल्ला आणि त्याची पत्नी खदिजा यांनी 10 वर्षांच्या हिंदू मुलीला दत्तक घेतले जिने तिचे पालक गमावले होते, ती आता 22 वर्षांची आहे.
अब्दुल्ला आणि त्याची पत्नी खदिजा यांनी तिचे लग्न एका हिंदू मुलाशी पूर्ण हिंदू विधींनी लावून दिले.
यावर चित्रपट काढण्याची… pic.twitter.com/ZvvjvMYXdO— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 6, 2023
यावर चित्रपट काढण्याची क्षमता तुमच्यात आहे का ? केवळ नकारात्मक गोष्टी दाखवायचा प्रयत्न चालू आहे. देशात धार्मिक दंगली कशा घडवता येतील, हा प्रयत्न १०० टक्के चालू आहे, असे ‘ट्वीट’ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
केरळमधील सहस्रावधी हिंदु आणि ख्रिस्ती युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना आतंकवादी कारवाया करण्यास भाग पाडण्याचे वास्तव उघड करणार्या ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाला आव्हाड यांनी या ‘ट्वीट’द्वारे धर्मांध आणि हिंसक ठरवले आहे. त्यासाठी त्यांनी केरळमधील एका मुसलमान कुटुंबाने हिंदु युवतीला दत्तक घेतल्याचा दाखला देत त्यांचे एक छायाचित्रही प्रसारित केले आहे. (असे असले, तरी केरळमधील लव्ह जिहादची प्रकरणे खोटी ठरतात का ? मुसलमानांच्या मतांसाठी आव्हाड आणखी किती मिंधेपणा करणार ? – संपादक)