उत्तरप्रदेशातील बांदा जिल्ह्यातील मुसलमानबहुल परिसरात हिंदूंना भारत सोडण्याची धमकी
लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेशातील बांदा जिल्ह्यात एका हिंदु कुटुंबाच्या घराच्या परिसरातील भिंतीवर हिंदूंना भारत सोडण्याची धमकी देण्यात आली आहे. बांदा जिल्ह्यातील कोतवालीनगर येथील मर्दाननाका परिसर हा मुसलमानबहुल असून येथे हिंदूंची संख्या फार अल्प आहे.
#bandapolice थाना कोतवाली नगर क्षेत्र के मर्दननाका की घटना के संबंध में थाना कोतवाली नगर में अभियोग पंजीकृत किया गया है। इस संबंध में वीडियो बाइट अपर पुलिस अधीक्षक बांदा श्री लक्ष्मी निवास मिश्र ।#UPPolice #लक्ष्मी_निवास_मिश्र pic.twitter.com/Tou88v9eUQ
— Banda Police (@bandapolice) May 6, 2023
१. या परिसरात रामलाल प्रजापती यांचे घर आहे. त्यांच्या घराच्या जवळच असलेल्या शौचालयाच्या भिंतीवर ‘हिंदूंनो, भारत सोडा, हिंदूंनो, घर सोडा’, असे लिहिण्यात आले होते.
२. ते पाहून तेथे जमाव जमा झाला. याविषयी पोलीस ठाण्यात कळवल्यावर पोलीस घटनास्थळी पोचले. पोलिसांनी भिंतीवरील लिखाण पुसून टाकले. याची माहिती मिळताच हिंदु संघटनांचे कार्यकर्ते घटनास्थळी जमा झाले. भिंतीवर हिंदुविरोधी लिखाण करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
३. या प्रकरणी पोलिसांनी प्रथमदर्शनी अहवाल नोंदवला आहे. ‘या प्रकरणी चौकशी करण्यात येत असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे पोलीस अधिकार्यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका
|