उत्तरप्रदेशातील बांदा जिल्ह्यातील मुसलमानबहुल परिसरात हिंदूंना भारत सोडण्याची धमकी !
लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेशातील बांदा जिल्ह्यात एका हिंदु कुटुंबाच्या घराच्या परिसरातील भिंतीवर हिंदूंना भारत सोडण्याची धमकी देण्यात आली आहे. बांदा जिल्ह्यातील कोतवालीनगर येथील मर्दाननाका परिसर हा मुसलमाबहुल असून येथील हिंदूंची संख्या फार अल्प आहे.
'हिन्दू भारत छोड़ो, हिन्दू मकान खाली करो': बांदा में घर की दीवारों पर लिखे मिले आपत्तिजनक नारे, पुलिस ने अज्ञात लोगों पर की FIR दर्ज#Uttarpradesh #Banda #AntiHinduSloganshttps://t.co/Q6JMG5vWSK
— ऑपइंडिया (@OpIndia_in) May 7, 2023
१. या परिसरात रामलाल प्रजापती यांचे घर आहे. त्यांच्या घराच्या जवळच असलेल्या शौचालयाच्या भिंतीवर ‘हिंदूंनो, भारत सोडा, हिंदूंनो, घर सोडा’, असे लिहिण्यात आले होते.
२. ते पाहून तेथे जमाव जमा झाला. याविषयी पोलीस ठाण्यात कळवल्यावर पोलीस घटनास्थळी पोचले. पोलिसांनी भिंतीवरील लिखाण पुसून टाकले. जेव्हा हिंदु संघटनांना याची माहिती मिळाली, त्या वेळी हिंदु संघटनांचे कार्यकर्ते घटनास्थळी जमा झाले. भिंतीवर हिंदुविरोधी लिखाण करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली.
३. या प्रकरणी पोलिसांनी प्रथमदर्शनी अहवाल नोंदवला आहे. ‘या प्रकरणी चौकशी करण्यात येत असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे पोलीस अधिकार्यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका
|