कोकणात मोठा स्टील प्रकल्प येणार
रत्नागिरी – कोकणात मोठा स्टील प्रकल्प येणार आहे. आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लि. या आस्थापनाने हा प्रकल्प उभारण्याची सिद्धता दर्शवली आहे. यासाठी या आस्थापनाने समुद्रकिनारी अनुमाने ५ सहस्र हेक्टर जागेची मागणी केली आहे. या आस्थापनाने या प्रकल्पासाठी ८० सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मलिकनेर आणि आर्सेलर मित्तल आस्थापनाचे राजेंद्र तोडापूरकर यांच्यात या प्रकल्पाविषयी मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीत या प्रकल्पाविषयी प्राथमिक स्तरावर चर्चा करण्यात आली.
कोकणात मोठा स्टील प्रकल्प येणार, समुद्रकिनारी ५ हजार हेक्टर जागेची मागणी; हजारो रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता https://t.co/M2EW8Qt4dG #ratnagiri #Konkan #SteelPlant #Maharashtra #Jobs
— Maharashtra Times (@mataonline) May 6, 2023
या बैठकीत औद्योगिक विकास महामंडळाकडून सुचवण्यात आलेल्या रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांतील जागांचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास आणि पहाणी संबंधित आस्थापनेकडून केली जाणार आहे.