काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांचे कुटुंबीय यांची हत्या करण्याचा भाजप नेत्याचा कट !
काँग्रेसचे नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांचा आरोप
बेंगळुरू (कर्नाटक) – काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या हत्येचा भाजपच्या नेत्याने कट रचला आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केला आहे. ‘मल्लिकार्जुन खरगे यांच्या हत्येचा कट रचण्यापर्यंत भाजपची मजल गेली आहे’, असा आरोप सुरजेवाला यांनी केला.
कांग्रेस नेता रणदीप सिंह सुरजेवाला का बड़ा दावा, "BJP नेता मल्लिकार्जुन खड़गे और उनके पूरे परिवार को मारने की फिराक में हैं"।#Congress #BJP #Karnataka #RandipSinghSurjewala #Kharge pic.twitter.com/rTbOR2mVSz
— News Express (@newsexpresslive) May 6, 2023
रणदीपसिंह सुरजेवाला म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांची खिल्ली उडवली होती. भाजपच्या नेत्याने खरगे यांच्या निधनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भाजप हतबल झाला असून त्याला आलेली निराशा आता धोकादायक पातळीवर पोचली आहे.