छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांची नियुक्ती !
छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून वर्ष १९९३ च्या ‘बॅच’चे (तुकडीचे) पोलीस अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी ५ मे या दिवशी मावळते विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम्.एम्. प्रसन्ना यांच्याकडून पद्भार स्वीकारला. ८ दिवसांपूर्वी गृह मंत्रालयाकडून राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्याचे स्थानांतर करण्यात आले होते.