साधकांनो, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्याविषयी भावभक्ती आणि श्रद्धा वाढवणार्या ग्रंथांची खरेदी करा !
साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करून त्यांना भवसागरातून तारणारे आणि अल्प कालावधीत धर्म, अध्यात्म इत्यादी सर्वच विषयांवरील लिखाण अखिल मानवजातीपर्यंत पोचवून जगदोद्धाराचे कार्य करणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या संदर्भातील माहिती जाणून घेण्यास सर्वच जण उत्सुक असतात. ११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव आहे. ‘या कालावधीत साधकांची भावभक्ती आणि श्रद्धा वाढावी’, यासाठी साधक पुढील सारणीत दिलेले ग्रंथ खरेदी करून त्यांचे वाचन करू शकतात. हे ग्रंथ सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून दिले आहेत.
या ग्रंथांमध्ये गुरुदेवांचे अलौकिकत्व, तसेच त्यांचे विश्वव्यापी कार्य इत्यादींविषयीचे विवेचन दिले आहे. हे ग्रंथ वाचून आपल्यामधील भावभक्ती आणि श्रद्धा वृद्धींगत होण्यास निश्चितच साहाय्य होईल, तसेच जुलैमध्ये गुरुपौर्णिमा आहे. या कालावधीतही गुरुदेवांवरील भावभक्ती आणि श्रद्धा वृद्धींगत होण्यासाठी या ग्रंथांचा लाभ करून घेता येईल. त्यामुळे साधक हे ग्रंथ आवर्जून खरेदी करू शकतात.