पूर्णवेळ ग्रामसेवकाच्या मागणीसाठी मसूर (जिल्हा सातारा) ग्रामपंचायतीला ग्रामस्थांकडून टाळे !
सातारा, ६ मे (वार्ता.) – कराड तालुक्यातील मसूर ग्रामपंचायतीला एक वर्षाहून अधिक काळ होऊनही प्रभारी ग्रामसेवकच आहे. त्यामुळे ग्रामस्थांची अनेक कामे रखडत आहेत. ग्रामपंचायतीसाठी पूर्णवेळ ग्रामसेवक द्यावा, या मागणीसाठी सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकारी यांनी ग्रामपंचायतीला टाळे लावण्याची चेतावणी जिल्हा प्रशासनाला दिली होती. तरीही प्रशासनकडून याची गंभीर नोंद घेतली गेली नाही. शेवटी १ मे या दिवशी पूर्णवेळ ग्रामसेवक मिळावा, या मागणीसाठी सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकार्यांनी मसूर ग्रामपंचायतीला टाळे लावून आंदोलन केले. आंदोलनामुळे ग्रामस्थांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकारी यांनी घेतली आहे.