‘ऑनलाईन गेम’ खेळतांना लाखो रुपये गमावल्याने तरुणाची आत्महत्या !
छत्रपती संभाजीनगर येथील घटना !
छत्रपती संभाजीनगर – मेकॅनिकल डप्लोमाचे शिक्षण घेतलेल्या गौरव पवार (वय २३ वर्षे) याने ५ मे या दिवशी हर्सूल तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ‘ऑनलाईन गेम’मध्ये लाखो रुपये हरल्याने तो तणावात गेला. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गौरव खासगी आस्थापनात काम करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि २ विवाहित बहिणी आहेत.
संपादकीय भूमिका
|