कल्याण येथे गोतस्करी करणार्या धर्मांधांच्या कह्यातून २ गायींची सुटका !
५० सहस्र रुपये किंमतीचे गोमांस आणि २ लाख ६० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त
“हे छायाचित्र छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक”
ठाणे, ६ मे (वार्ता.) – शहापूर, मुरबाड तालुक्यातील चरणार्या गायींना धर्मांधांनी गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. कल्याण येथील पत्रीपुलाजवळील रेतीबंदर भागात आणून त्यांची हत्या केली आणि त्यांच्या मांसाच्या विक्रीसाठी वाहतूक करण्यात येत असतांना हा प्रकार कल्याण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी सोयब निजाम करके (वय ३२ वर्षे) या धर्मांधाला कह्यात घेतले आहे, तर त्याचे अन्य धर्मांध साथीदार इब्राहिम इस्माईल मजीद, अरबाज गोरू, मच्छी आवली, बारक्या हे पसार झाले आहेत.
पोलिसांनी धर्मांच्या तावडीतून२ जिवंत गायींची सुटका केली असून घटनास्थळावरून पोलिसांनी ५० सहस्र रुपये किंमतीचे गोमांस, तसेच चाकू, सुरे, तलवारी आणि २ मोटारी, रिक्शा असा एकूण २ लाख ६० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गायींची हत्या करून गोमांस काळ्या बाजारात २०० रुपये प्रति किलो दराने विक्री करण्याचा आरोपींचा धंदा असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याने आरोपींविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकागोवंश हत्याबंदी कायद्याचेही भय वाटत नसल्यामुळेच धर्मांध गोहत्या करण्याचे सर्रास धाडस करतात ! असे प्रकार थांबण्यासाठी कायद्यानुसार धर्मांधांना कठोर शिक्षाच करायला हवी ! |