सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
साधकांनी देह आणि मन यांचा विचार न करता ध्येयाची अन् त्यासंदर्भातील कृतीची सतत जाणीव ठेवायला हवी ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
शिष्याच्या जीवनात गुरूंचे महत्त्व
१. एखादा शिष्य गुरूंच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी ‘गुरूंना आवडणारी (अपेक्षित) साधना करणे’ एवढेच करू शकतो. त्याच्या पलीकडे शिष्याकडे काहीच नसते.
२. गुरूंनी सांगितलेली साधना केल्याने शिष्याच्या प्रारब्धातील ग्रहगतीमुळे होणारा त्रास न्यून होणे : गुरूंचा ‘अनुग्रह’ शिष्याच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा असतो. गुरूंनी सांगितलेली साधना केल्याने शिष्याच्या प्रारब्धातील ग्रहगतीमुळे होणारा त्रासही न्यून होतो; म्हणून शिष्याला सामान्य माणसांना असते, तशी जीवनातील नवग्रहांच्या पीडेविषयी काळजी वाटत नाही. गुरुकृपा शिष्याच्या जीवनातील भोग न्यून करते.
३. समाजातील संतांनी जाणलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची महानता ! : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सनातनच्या साधकांना गुरुमंत्र दिलेला नाही; पण त्यांची कृपा मात्र साधकांवर आहे. गुरुदेवांनी केलेला हा अनुग्रह सामान्य व्यक्तीच्या लक्षात येत नाही. सनातनचे साधक समाजातील संतांकडे गेल्यावर ते संत साधकांना सांगतात, ‘‘सनातनच्या साधकांवर फार मोठी गुरुकृपा आहे.’’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ