‘द केरल स्टोरी’ चित्रपट ‘इस्लामिक स्टेट’वर आहे, याला विरोध करणारे आतंकवादी आहेत ! – अभिनेत्री कंगना राणावत
मुंबई – ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट इस्लामिक स्टेटविना कुणालाही वाईट किंवा चुकीचे म्हणत नाही, असे देशातील सर्वांत उत्तरदायी संस्था असणारे उच्च न्यायालय असे म्हणत असेल, तर त्याचे म्हणणे बरोबर आहे. इस्लामिक स्टेट ही आतंकवादी संघटना आहे. मीच या संघटनेला आतंकवादी म्हणत आहे, असे नाही, तर आपला देश, गृहमंत्रालय आणि इतर देशांनीही तेच म्हटले आहे. जर तुम्हाला वाटत असेल की, ती आतंकवादी संघटना नाही, तर मग तुम्हीही आतंकवादी आहात, हे उघड आहे. तुम्हाला या चित्रपटाविषयी तसे वाटत नसेल, तर ती चित्रपटाची नाही, तर तुमची समस्या आहे. तुम्ही आधी विचार केला पाहिजे की, तुम्ही आयुष्यात कुठे उभे आहात?, असा प्रश्न अभिनेत्री कंगना राणावत यांनी उपस्थित केला आहे. त्या एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होत्या.
‘If you think it is attacking you, not ISIS, then you are also a terrorist’: Kangana Ranaut on those opposing film The Kerala Storyhttps://t.co/O826npj3Pf
— OpIndia.com (@OpIndia_com) May 6, 2023
कंगना राणावत पुढे म्हणाल्या की, मी अशा लोकांविषयी बोलत आहे, ज्यांना वाटते की, हा चित्रपट इस्लामिक स्टेटवर नाही, तर त्यांच्यावर आक्रमण करणारा आहे. तुम्हाला असे वाटत असेल, तर तुम्ही आतंकवादी आहात. इतके साधे हे गणित आहे.