समलैंगिकता एक विकृती असून या विवाहाला मान्यता दिल्यास समाजात हा प्रकार वाढीस लागेल ! – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, महिला शाखा
रा.स्व. संघाशी संलग्न असलेल्या महिला शाखेने केलेले सर्वेक्षण
नवी देहली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला शाखेशी संलग्न असलेल्या ‘संवर्धिनी न्यास’ने समलिंगी विवाहाविषयी एक सर्वेक्षण केले आहे. यात समलिंगी विवाह म्हणजे एक विकार असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. यामध्ये देशभरातील ३१८ तज्ञांची मते नोंदवण्यात आली. यामध्ये आधुनिक विज्ञानापासून ते आर्युर्वेदापर्यंत ८ वेगवेगळ्या उपचार पद्धतींच्या अभ्यासकांचा समावेश आहे. या तज्ञांनी ‘समलैंगिकता एक विकृती असून या विवाहाला मान्यता दिल्यास समाजात असले प्रकार वाढीस लागतील’, असे म्हटले आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात समलिंगी विवाहाच्या प्रकरणी सुनावणी चालू आहे.
#Homosexuality a 'disorder', will increase if…: #RSS body survey amid SC's same-sex marriage hearing https://t.co/nfBOWZ3CfV
— IndiaToday (@IndiaToday) May 6, 2023
१. सर्वेक्षणानुसार सुमारे ७० टक्के डॉक्टर आणि तज्ञ मलैंगिकता हा एक विकार असल्याचे मानतात, तर ८३ टक्के लोकांचे म्हणणे आहे की, समलिंगी संबंधांमुळे लैंगिक आजार वाढू शकतात. ६७ टक्क्यांहून अधिक डॉक्टरांना असे वाटते की, समलिंगी पालक त्यांच्या मुलांचे योग्य प्रकारे संगोपन करू शकत नाहीत.
समलैंगिकता एक रोग, विवाह को मिली कानूनी मान्यता तो समाज में यह और बढ़ेगा, RSS के सर्वे में डॉक्टरों का दावा#RSS #Survey #Homosexuality @RSSorg https://t.co/8Tz0V1tBfS pic.twitter.com/RqG1JA4b9D
— Dainik Jagran (@JagranNews) May 6, 2023
२. या सर्वेक्षणात समलिंगी जोडप्यांना ‘मानसिक रुग्ण’ संबोधण्यात आले आहे. या विवाहांना कायदेशीर मान्यता दिल्यास रुग्ण बरे होणार नाहीत, तर समाजात विकृती अधिक वेगाने वाढणार आहे. अशा प्रकारचे मानसिक विकार असलेले रुग्ण समुपदेशनाने बरे होऊ शकतात. समलैंगिकतेच्या प्रकरणी कोणताही निर्णय घेण्याआधी जनमत घेतले पाहिजे.