‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ (प्रार्थनास्थळे कायदा) रहित करा !
देशातील जवळजवळ ३६ सहस्र मंदिरांवर परकियांनी आक्रमण करून त्यावर अतिक्रमण केले आहे. अनेक मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्या आहेत. काशी-मथुरेसह हिंदूंच्या अनेक धार्मिक अन् ऐतिहासिक स्थळांची मुक्ती होणे बाकी आहे. काशी विश्वेश्वर, मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी, तसेच धार (मध्यप्रदेश) येथील सुप्रसिद्ध ‘भोजशाला’ या पवित्र स्थानांना पुनर्वैभव प्राप्त करून देणे आवश्यक आहे ! ताजमहाल, कुतूबमिनार, ज्ञानवापी परिसर यांसह देशातील बहुतांश सर्वच इस्लामी वास्तू या हिंदूंची मंदिरे पाडूनच बांधण्यात आल्या आहेत. या सर्वांचे सर्वेक्षण झाल्यास ती हिंदूंची मंदिरेच आहेत, हेच पुढे येईल; मात्र तसे सिद्ध होण्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा हा ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’चा (प्रार्थनास्थळे कायदा) आहे. सरकारने सर्वप्रथम तो कायदा रहित करून हिंदूंची मंदिरे भक्तांच्या स्वाधीन करावीत.
– श्री. सुनील घनवट, राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती (१.२.२०२३)