चिपळूण येथे मध्यवर्ती बसस्थानकामध्ये उन्हाळा न्यून होईपर्यंत केली थंडगार पाण्याची व्यवस्था
शिवसेनेच्या युवासेनेचा उपक्रम !
चिपळूण, ५ मे (वार्ता.) – येथील मध्यवर्ती बसस्थानकामध्ये ग्रामीण भागांतून येणार्या सर्व नागरिकांसाठी शिवसेनेच्या युवासेनेच्या वतीने आज ५ मे पासून उन्हाळा न्यून होईपर्यंत थंडगार पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हा उपक्रम हा पर्यावरणपूरक असून कागदी ग्लासमधून या पाण्याचे वाटप करण्यात येणार आहे, तसेच विद्यार्थीही स्वतःच्या बाटलीमधूनही हे पाणी भरून घेऊ शकतील, अशी व्यवस्था येथे करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी युवा सेना तालुकाप्रमुख निहार कोवळे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. ओंकार नलावडे यांनी विशेष अर्थसाहाय्य केले आहे.
शिवसेना तालुकाप्रमुख संदेश बापू आयरे, शहरप्रमुख महंमद फकीर, तालुकाप्रमुख निहार कोवळे, उपशहरप्रमुख अंकुश आवले, मा. नगरसेवक करामत मिठागरी, गणेश भालेकर, उपतालुका प्रमुख आदित्य जोशी, शहरप्रमुख विनोद पिल्ले, शहर सचिव अमेय चितळे, उपशहरप्रमुख शुभम् कदम, प्रसाद शिंदे, सुरज साळुंखे, युवराज साळुंखे, पुष्कर चव्हाण, मंदार भाटकर, गौरव जोशी, शुभम् पिटले, प्रथमेश काळे, प्रणव सुतार, सिद्धेश खेडेकर, पार्थ रहाटे, जतिश लाड, सुशिल खेडेकर आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.