शरद पवार यांचे त्यागपत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य समितीने एकमताने फेटाळले !
मुंबई – शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचे दिलेले त्यागपत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य समितीने फेटाळले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात ५ मे या दिवशी या समितीच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. समितीने पत्रकार परिषद घेऊन याविषयीची माहिती दिली. शरद पवार यांनी दिलेल्या त्यागपत्रानंतर नवीन अध्यक्षांची निवड करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली होती.
Hours after his resignation was rejected, now NCP chief Sharad Pawar briefs the media.
'Party workers wanted me to reconsider my decision', says Sharad Pawar pic.twitter.com/f94Hlp2dQC
— TIMES NOW (@TimesNow) May 5, 2023
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांचे त्यागपत्र फेटाळण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या वेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले, ‘‘शरद पवार निवृत्तीचा निर्णय घोषित करतील, याविषयी मुळीच कल्पना नव्हती. शरद पवार यांनी कुणालाही विश्वासात न घेता त्यागपत्राचा निर्णय घेतला. शरद पवार यांनीच पक्षाच्या अध्यक्षपदी रहावे, अशी आम्ही विनंती करत आहोत. शरद पवार यांची भेट घेऊन समितीने घेतलेल्या निर्णयाविषयी त्यांना कळवू. त्यांनी किती काळ अध्यक्ष रहावे ?, याविषयी आम्ही कोणतीही कालमर्यादा दिलेली नाही.’’