बिलावल भुट्टो यांच्याकडून अप्रत्यक्ष काश्मीरचा उल्लेख करत भारतावर टीका
पाकिस्तान – पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी पत्रकारांशी बोलतांना म्हटले, ‘एखाद्या देशाकडून एकतर्फी आणि अवैधरित्या पाऊल उचलणे हे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे आणि सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांचे उल्लंघन आहे. तसेच हे शांघाय सहकार्य परिषदेच्या उद्देशांच्याही विरोधात आहे.’
भुट्टो यांनी हे विधान काश्मीरमधील ३७० कलम रहित करण्यावरून केले आहे. त्यांनी काश्मीरचे नाव घेण्याचे या वेळी जाणीवपूर्वक टाळले. (याला म्हणतात जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही ! पाकिस्तान भारत किंवा जगाच्या पाठीवर कुठेही गेला, तरी तो काश्मीरचा उल्लेख करून भारतावर टीका करत रहाणार ! एकीकडे पाक भिकेला लागला असतांनाही त्याची काश्मीरविषयीची आस सुटत नाही ! – संपादक)