‘द केरल स्टोरी’ चित्रपट आतंकवाद्यांच्या षड्यंत्राची कथा ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी
बेंगळुरू (कर्नाटक) – गेल्या काही वर्षांमध्ये आतंकवादाचे आणखी एक भयानक स्वरूप निर्माण झाले आहे. बाँब, बंदूक आणि पिस्तूल यांचा आवाज ऐकू येत होतो; मात्र समाजाला पोखरण्याच्या आतंकवाद्यांच्या षड्यंत्राचा आवाज समोर येत नाही. अशा एका षड्यंत्राविषयी माहिती देणारा चित्रपट ‘द केरल स्टोरी’ चर्चेत आहे. असे म्हणतात की, ‘द केरल स्टोरी’ केवळ एका राज्यात झालेल्या आतंकवाद्यांच्या नीतीवर आधारित आहे; मात्र हा चित्रपट एका राज्याची गोष्ट नाही, तर संपूर्ण आतंकवाद्यांच्या षड्यंत्राची कथा आहे, जी या चित्रपटातून उघड करण्यात आली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतील एका प्रचारसभेत ते बोलत होते.
The film Kerala Story is in vogue these days.
How the terroristic conspiracies are being nurtured in a State which is otherwise known for the hardworking, talented and intellectual people, is unveiled by this film.
– PM @narendramodi
Watch full video:https://t.co/y4PGrEE4iB pic.twitter.com/biTZMQJA9R
— BJP (@BJP4India) May 5, 2023
काँग्रेस ‘द केरल स्टोरी’वर बंदी घालण्याच्या प्रयत्नात !
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, या देशाचा दुर्दैव आहे की, समाजाला उद्ध्वस्त करणार्या आतंकवादी प्रवृत्तींच्या पाठीशी काँग्रेस उभी राहिलेली दिसत आहे. इतकेच नाही, तर अशा आतंकवादी प्रवृत्तींच्या लोकांशी काँग्रेस मागच्या दाराने राजकीय सौदेबाजी करत आहे. कर्नाटकातील लोकांना यामुळेच काँग्रेसपासून सावध रहाण्याची आवश्यकता आहे. हे लोक ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहेत.