ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तान्यांकडून हिंदु मंदिराची तोडफोड !
मंदिरावर लिहिले ‘मोदी यांना आतंकवादी घोषित करा !’
सिडनी (ऑस्ट्रेलिया) – येथील स्वामीनारायण मंदिरावर खलिस्तान्यांनी आक्रमण करून तोडफोड केली. येथे भिंतीवर ‘मोदी यांना आतंकवादी घोषित करा’ असेही लिहिले. तसेच मंदिराच्या दारावर खलिस्तानचा झेंडा लावला. ही घटना ५ मे या दिवशी सकाळी घडली. या संदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.
ऑस्ट्रेलिया में निशाने पर हिंदू मंदिर, सिडनी में की गई तोड़फोड़, PM मोदी के खिलाफ लिखे आपत्तिजनक नारे#Austraila | #HinduTemple https://t.co/19UoKLLsWh
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) May 5, 2023
यापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये अनेक वेळा हिंदूंच्या मंदिरांवर खलिस्तान्यांकडून आक्रमण करण्यात आले आहे. याविषयी मार्चमध्ये पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिज यांच्याशी चर्चाही केली होती. तेव्हा अल्बानिज यांनी ‘भारतियांचे रक्षण केले जाईल’, असे आश्वासनही दिले होते; मात्र प्रत्यक्षात त्यांचे सरकार निष्क्रीय ठरल्याचेच या घटनेतून दिसून आले आहे.
संपादकीय भूमिकाऑस्ट्रेलिया सरकार हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण करण्यास पुन्हा निष्क्रीय ! ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि ब्रिटन या देशांमध्ये खलिस्तानवादी शीख हिंदूंची मंदिरे आणि दूतावास यांवर थेट आक्रमण करतात अन् तेथील पोलीस, प्रशासन निष्क्रीय रहातात, आक्रमणकर्त्यांवर कारवाई करत नाहीत. यावरून त्यांची खलिस्तान्यांना फूस आहे, असेच लक्षात येते ! भारताने अशा देशांना खडसावणे आवश्यक आहे ! |