पाकमध्ये ५० हिंदूंचे धर्मांतर !
प्रशिक्षण केंद्रात ठेवून इस्लामचे शिक्षण देेणार !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये १० कुटुंबांतील ५० हिंदूंचे एका मदरशामध्ये सामूहिक धर्मांतर करून त्यांना मुसलमान बनवण्यात आले आहे. आता त्यांना ४ मास इस्लामचे शिक्षण दिले जाणार आहे. त्यांना एका प्रशिक्षण केंद्रात ठेवण्यात येणार आहे. पाकच्या सिंध प्रांतातील मीरपुरखास येथे ही घटना घडली आहे. धर्मांतराच्या या कार्यक्रमाला देशाचे धर्माविषयीचे मंत्री महंमद तल्हा महमूद यांचा मुलगा महंमद समरोज खान याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते.
पाकिस्तान में 23 महिलाओं सहित 50 हिन्दुओं का इस्लामी धर्मांतरण, इनमें 1 साल की बच्ची भी: 4 महीने दी जाएगी मजहब की ट्रेनिंग, कार्यक्रम में आया मंत्री का बेटा#Pakistan #Conversion #Hindushttps://t.co/97shvZRPsM
— ऑपइंडिया (@OpIndia_in) May 4, 2023
संपादकीय भूमिकाभारतात हिंदूंनी धर्मांतरितांची घरवापसी केली, म्हणजे त्यांना पुन्हा हिंदु धर्मात आणले, तरी त्याला विरोध करणारे याविषयी मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या ! |