अजित पवार यांचा भाजपप्रवेश रोखण्यासाठी शरद पवार यांचे त्यागपत्र ! – दैनिक सामना
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भाजपच्या उंबरठ्यापर्यंत पोचला आहे. पक्षातील ‘ईडी’सारख्या अन्वेषण यंत्रणांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता आणि त्यातून सहकार्यांनी निवडलेला भाजपचा मार्ग हे कारण शरद पवार यांच्या त्यागपत्रात आहे काय ? हा पहिला प्रश्न. दुसरे म्हणजे ‘अजित पवार आणि त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या सिद्धतेत असतांना त्यांना अडवण्यासाठी शरद पवार यांनी हे पाऊल उचलले आहे काय ?’, असा प्रश्न दैनिक ‘सामना’च्या ४ मे या दिवशीच्या संपादकीयमधून उपस्थित केला आहे.