कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणार नाही ! – शरद पवार
मुंबई – जो निर्णय मी घेतला आहे, तो पक्षाच्या भवितव्यासाठी आहे. तरीही यावर पुनर्विचार करून मी दोन दिवसानंतर निर्णय घेईन. निर्णय घेतांना कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणार नाही, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले. शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचे त्यागपत्र देण्याचा निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी यशवंतराव प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपोषण चालू केले आहे. ४ मे या दिवशी शरद पवार यांनी आंदोलस्थळी जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांना वरील आश्वासन दिले.