६ मे या दिवशी बारसू येथे प्रकल्पग्रस्तांची भेट घेणार ! – उद्धव ठाकरे
मुंबई – प्रकल्प करण्यापूर्वी स्थानिकांपुढे प्रकल्पाच्या आराखड्याचे सादरीकरण व्हायला हवे. बळजोरीने प्रकल्पाची उभारणी करण्यात येऊ नये. ६ मे या दिवशी बारसू येथे जाऊन प्रकल्पग्रस्तांची घेट घेणार आहे, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी ४ मे या दिवशी पत्रकार परिषदेत केली.
या वेळी शरद पवार यांच्या त्यागपत्राविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘प्रत्येक पक्षाला अंतर्गत व्यवस्थापन करण्याचा अधिकार असतो. त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला आहे. आमच्याकडून मात्र महाविकास आघाडीला तडा जाईल, अशी कोणतीही गोष्ट होणार नाही.’’