पिलीभीत (उत्तरप्रदेश) येथे रोहित उपाख्य इमरान या पोलीस कर्मचार्याने केला लव्ह जिहाद !
इमरान आणि त्याचा भावाकडून हिंदु युवतीवर सामूहिक बलात्कार आणि धर्मांतरासाठी दबाव !
पिलीभीत (उत्तरप्रदेश) – येथे लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले असून एका हिंदु युवतीला रोहित उपाख्य इमरान मिर्झा नावाच्या पोलीस कर्मचार्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याची घटना घडली आहे. इमरानने त्याचा धर्म आणि ओळख लपवून हिंदु युवतीला फसवले, तसेच तिला विवाहाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती गर्भवती राहिल्यावर तिला बलपूर्वक गर्भपात करायला लावला. पुढे तिच्याशी मंदिरात विवाह करण्याचे नाटक केले. यानतंर मिर्झा आणि त्याचा भाऊ फुरकान यांनी पीडितेला बंदूकीचा धाक दाखवत तिच्यावर अनेक वेळा सामूहिक बलात्कार केला, तसेच इस्लाममध्ये धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला. या सगळ्याला कंटाळून पीडितेने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. त्यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवत इमरानला निलंबित केले आहे.
Horrific case of #LoveJihad from Pilibhit, Uttar Pradesh (@Uppolice)
A Muslim police officer/constable posted at Neoria Police station in Pilibhit, UP named Imran Mirza faked his identity as Hindu man Rohit & entrapped a Hindu girl into relationship. 1/nhttps://t.co/eQfsixRJey
— World Hindu Council (@WldHinduCouncil) May 3, 2023
संपादकीय भूमिका
|