आतंकवादी आक्रमणात अतीमहत्त्वाच्या वास्तू सुरक्षित ठेवण्याविषयीचा तज्ञांचा अहवाल राज्यशासनाला सादर !
मुंबई – आतंकवादी आक्रमण, तसेच अन्य मानवनिर्मित आपत्ती यांपासून रुग्णालये, पंचतारांकित हॉटेल्स, शाळा, देवस्थाने आदी अतीमहत्त्वाच्या वास्तू सुरक्षित कशा ठेवव्यात ? याविषयी उपाययोजना सुचवणारा अहवाल तज्ञ समितीने राज्यशासनाकडे सादर केला आहे.
मानवनिर्मित आपत्ती, दहशतवादी हल्ल्यांपासून राज्यातील अतिमहत्त्वाच्या इमारती तसेच रुग्णालये, पंचतारांकित हॉटेल, शाळा, देवस्थानांच्या इमारतींना संरक्षणात्मक उपाययोजना सूचविणारा अहवाल प्रविण परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीने मुख्यमंत्री @mieknathshinde यांना सुपूर्द केला. pic.twitter.com/qpW4n0dFJb
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 3, 2023
तज्ञांच्या समितीने ३ मे या दिवशी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा अहवाल त्यांच्याकडे सुपुर्द केला. तज्ञांच्या समितीचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, सदस्य अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महापालिकेचे मुख्य अभियंता सुनील राठोड, वास्तूविशारद संदीप ईश्वरे, एन्.आर्. शेंडे यांनी हा अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला. आतंकवादी आक्रमणे, मानवनिर्मित्त आपत्ती यांमध्ये जीवित आणि वित्त हानी होऊ शकते, तसेच आर्थिक विकासाला त्याचा फटका बसतो, हे लक्षात घेऊन हे टाळण्याच्या दृष्टीने हा अहवाल सिद्ध करण्यात आला आहे.