उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड अनिल दुजाना पोलीस चकमकीत ठार
मेरठ – पश्चिम उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड अनिल दुजाना हा मेरठच्या जानी भागात उत्तरप्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलासमवेत झालेल्या चकमकीत ठार झाला. अनिल दुजाना याच्यावर ६२ गुन्हे नोंद असून अनेक गुन्ह्यांमध्ये तो फरार होता. अनिल दुजाना याच्यावर ७५ सहस्र रुपयांचे बक्षीस होते.
यूपीमध्ये आणखी एक एन्काउंटर; कुख्यात गुंड अनिल दुजाना ठारhttps://t.co/H4qzytnV8Z #UP #uttarpradeshnews #anildujana #AnilDujanaDead #Meerut #UPSTF
— Hindustan Times Marathi (@htmarathi) May 4, 2023
अनिल दुजाना काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटला होता. तो तिहार कारागृहात बंदिस्त होता. कारागृहातून बाहेर येताच त्याने जयचंद प्रधान हत्या प्रकरणी त्याची पत्नी तथा या प्रकरणातील साक्षीदार संगीता हिला धमकी दिली होती. यानंतर पोलिसांनी अनिल दुजाना याच्या विरोधात २ गुन्हे नोंदवले होते. दुजानाच्या अटकेसाठी नोएडा पोलीस आणि विशेष कृती दल विविध ठिकाणी सतत धाड घालत होते.