संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या व्यवस्थेमध्ये पालट करण्याची आवश्यकता ! – भारताची मागणी
न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सध्याच्या व्यवस्थेमध्ये आफ्रिका खंड, दक्षिण अमेरिका, जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणारा भारत देश आदींना यात प्रतिनिधित्व नाही. अशा वेळी या परिषेदील ५ सदस्यांनाही अन्य देशांप्रमाणे समान ठरवून सहभागी करता येईल, अशी मागणी भारताने या परिषदेच्या बैठकीत केली. या परिषदेमध्ये जगभरात शांतता निर्माण करण्याच्या विषयावर चर्चा होत आहे. त्या चर्चेच्या वेळी भारताच्या प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी ही मागणी केली. ‘जर परिषद भविष्यामध्ये शांतता निर्माण करू इच्छित असेल, तर प्रथम इतिहासातून शिकण्याची आवश्यकता आहे’, असेही कंबोज यांनी या वेळी सांगितले.
सौजन्य एएनआय