पुरी (ओडिशा) येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराचा खजिना उघडा ! – भाजप आणि काँग्रेस यांची मागणी
खजिन्याची चावी गहाळ झाल्याचा राज्य सरकारचा दावा !
पुरी (ओडिशा) – येथील जगन्नाथ मंदिरातील रत्नांचा खजिना ३९ वर्षांपासून बंद आहे. वर्ष १९८४ मध्ये तो शेवटचा उघडण्यात आला होता. या खजिन्यामध्ये १५० किलो सोने आणि २५८ किलो चांदी आहे. खजिना उघडावा आणि या संपत्तीचे लेखापरीक्षण करावे, अशी मागणी भाजप आणि काँग्रेस या पक्षांनी केली आहे. ओडिशा उच्च न्यायालयानेही या प्रकरणात राज्य सरकारकडून १० जुलैपर्यंत उत्तर मागवले आहे. खजिना न उघडण्यामागे रत्न भंडाराच्या आतल्या खोलीची चावी मिळत नसल्याचे कारण राज्य सरकार सांगत आहे.
BJP, Congress attack Odisha govt over missing keys of Puri Jagannath temple ‘Ratna Bhandar’ https://t.co/n6Z8JVllkH
— Newsd (@GetNewsd) April 28, 2023
संपादकीय भूमिका
|