जगात सर्वाधिक विवाह केवळ भारतातच टिकतात !
पोतुर्गालमध्ये ९४ टक्के विवाहांचे पर्यावसान होते घटस्फोटांत !
नवी देहली – संपूर्ण जगात घटस्फोटांचे सर्वांत अल्प प्रमाण केवळ भारतात आहे. घटस्फोटांसंदर्भात नुकत्याच घोषित झालेल्या आकडेवारीनुसार, भारतात घटस्फोटांचे प्रमाण केवळ १ टक्का आहे, तर पोर्तुगाल या युरोपीय देशात हे प्रमाण ९४ टक्क्यांपर्यंत आहे. ‘वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स’ने दिलेल्या माहितीनुसार, आशिया खंडातील देशांमध्ये विवाह मोडण्याचे प्रमाण अल्प आहे, तर युरोप आणि अमेरिका खंडात हे प्रमाण सर्वाधिक आहे.
Divorce rate:
🇮🇳India: 1%
🇻🇳Vietnam: 7%
🇹🇯Tajikistan: 10%
🇮🇷Iran: 14%
🇲🇽Mexico: 17%
🇪🇬Egypt: 17%
🇿🇦South Africa: 17%
🇧🇷Brazil: 21%
🇹🇷Turkey: 25%
🇨🇴Colombia: 30%
🇵🇱Poland: 33%
🇯🇵Japan: 35%
🇩🇪Germany: 38%
🇬🇧United Kingdom: 41%
🇳🇿New Zealand: 41%
🇦🇺Australia: 43%
🇨🇳China: 44%…— World of Statistics (@stats_feed) May 1, 2023
१. भारतानंतर व्हिएतनाममध्ये सर्वांत अल्प, म्हणजे ७ टक्के घटस्फोट होतात, तसेच ताजिकिस्तानमध्ये १० टक्के, इराणमध्ये १४, तर मेक्सिकोमध्ये १७ टक्के घटस्फोट होतात.
२. जपानमध्ये हे प्रमाण ३५ टक्के, तर जर्मनीमध्ये ३८ टक्के आहे. ब्रिटनमध्ये ४१ टक्के घटस्फोट होतात, तर चीनमध्ये घटस्फोटांचे प्रमाण ४१ टक्के आहे. अमेरिकेत हा आकडा ४५ टक्के असून डेन्मार्क, दक्षिण कोरिया आणि इटली या देशांमध्ये ४७ टक्के विवाहांचे पर्यावसान घटस्फोटात होते.
३. घटस्फोटांचे सर्वाधिक प्रमाण पोर्तुगालमध्ये आहे. येथे ९४ टक्के घटस्फोट होतात, तर स्पेनमध्ये ८५ टक्के घटस्फोट होतात.
संपादकीय भूमिकाभारतात सनातन हिंदु धर्माची शिकवण असल्यानेच हे शक्य आहे. असे असले, तरी हिंदूंमधील धर्मशिक्षणाचा अभाव आणि पाश्चात्त्यांचे अंधानुकरण यांमुळे अनेक हिंदूंची अधोगतीकडे वाटचाल होत आहे, हेही खरे ! हे रोखण्यासाठी त्यांनाही धर्मशिक्षण देणे आवश्यक ! |