मुसलमान बांधवांनो, माझा हात सोडू नका ! – काँग्रेसचे मुसलमान आमदार रहीम खान यांचे मतांसाठी आवाहन
यापूर्वी केवळ मुसलमानांची मते मिळवूनच विजयी झाल्याची दर्पोक्ती !
बीदर (कर्नाटक) – कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान आमदार रहीम खान यांनी स्थानिक मुसलमानांना आवाहन करत म्हटले की, माझ्या विरोधात एक मोठे षड्यंत्र रचले गेले आहे. त्यामुळे मुसलमान बांधवांनो, माझा हात सोडू नका. मी तुमच्या गल्लीत आलो नाही, तरी तुम्हीच लक्ष द्या; कारण इतर समुदायांचे मत मिळावे; म्हणून मला प्रत्येकाच्या घरी जावे लागते. काहींनी आपल्याच समुदायातील लोकांना (मुसलमानांना) पैसे देऊन मलाच हरवण्याचे धोरण अवलंबले आहे. वर्ष २०१८ मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी केवळ मुसलमान मते मिळवूनच जिंकलो होतो.
संपादकीय भूमिका
|