उत्तरप्रदेश सरकारच्या आदेशाला विरोध करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली !
रामनवमी आणि चैत्र नवरात्री यांच्या काळातील धार्मिक कार्यक्रमांना प्रत्येकी १ लाख रुपयांच्या तरतुदीचे प्रकरण
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशमधील भाजप सरकारने रामनवमी आणि चैत्र नवरात्र या काळात धार्मिक कार्याक्रमांच्या आयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याला १ लाख रुपयांचे साहाय्य करण्याचा आदेश दिला होता. याला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने आव्हान देणारी ही याचिका फेटाळून लावली आहे. यापूर्वीच उच्च न्यायालयाच्या समन्वय पिठाकडून या संदर्भातील याचिका फेटाळून लावली होती. त्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते.
इलाहाबाद हाईकोर्ट ने चैत्र नवरात्रि के दौरान कार्यक्रम आयोजित करने के यूपी सरकार के सर्कुलर के खिलाफ जनहित याचिका खारिज की #ChaitraNavratri #UPGovt #AllahabadHighCourt https://t.co/oZmD9TXUXi
— Live Law Hindi (@LivelawH) May 3, 2023
उच्च न्यायालयाने म्हटले की, सरकारच्या पर्यटन विभागाकडून या संदर्भात आदेश देण्यात आला होता. हा आदेश विविध विकास कार्य, तसेच मंदिरांसाठी आणि मूलभूत सुविधांच्या विकासाच्या प्रचारासाठी देण्यात आला होता, असे लक्षात आले आहे. कोणत्याही मंदिराला किंवा पुजार्याला हे पैसे देण्यात येणार नव्हते.