सोलापूर विद्यापिठाच्या प्रभारी कुलगुरुपदी डॉ. आर्.के. कामत यांची निवड !
सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाच्या प्रभारी कुलगुरुपदी डॉ. आर्.के. कामत यांची राज्यपाल रमेश बैस यांनी निवड केली आहे. याविषयीचे पत्र कुलपती कार्यालयाकडून देण्यात आले आहे. डॉ. कामत हे मूळचे कोल्हापूर येथील असून ते गेल्या ९ मासांपासून डॉ. होमीभाभा राज्य विद्यापिठाचे पहिले कुलगुरु म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापिठात विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहिले आहे.