पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह सर्व पदाधिकार्यांचे त्यागपत्र !
शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र दिल्याचे प्रकरण
पुणे – प्रदीर्घ कालावधीनंतर आता कुठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र दिले; परंतु त्यांच्या या निर्णयाचा राष्ट्रवादीच्या राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून कडाडून विरोध होत आहे. अनेक पदाधिकारी अप्रसन्न होऊन पदाचे त्यागपत्र देत आहेत. पुण्यातही शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह सर्व पदाधिकार्यांनी त्यागपत्र देत असल्याचे सांगितले आहे. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयाजवळ पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्रित आले होते. या वेळी ‘शरद पवार यांनी त्यागपत्र परत घ्यावे’, अशी मागणी ते करत होते.