रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय
१. आश्रमात प्रत्येक ठिकाणी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अस्तित्व अनुभवायला मिळणे
‘अविश्वसनीय ! अवर्णनीय ! अद्भुत ! सनातनच्या रामनाथी आश्रमाचे शब्दांमध्ये वर्णन करणे अत्यंत कठीण आहे. येथे सगळीकडे चैतन्यच चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे जाणवते. प्रत्येक ठिकाणी गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) अस्तित्व अनुभवायला मिळते. भूलोकावर असे दुसरे ठिकाणच नाही. हा आश्रम पाहून मी धन्य धन्य झाले. कृतज्ञता !
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वापरलेल्या वस्तू पाहून भावजागृती होणे
‘अनिष्ट शक्तींकडून आक्रमणे होतात आणि साधनेमुळे चांगले पालटही होऊ शकतात’, यावर माझा विश्वासच बसत नाही. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वापरलेल्या वस्तू पाहून माझी पुष्कळ भावजागृती झाली.’
– सौ. यामिनी राव, दुर्ग, छत्तीसगड. (४.८.२०२२)
१. ‘मला रामनाथी आश्रमातील सर्व साधकांच्या चेहर्यावर सात्त्विक भाव दिसले.
२. साधकांनी ‘हिंदु राष्ट्रा’च्या निर्मितीसाठी हाती घेतलेले कार्य पुष्कळ चांगले आहे.’
– श्री. विवेक ल. बोरकर, बोरी, फोंडा, गोवा. (११.९.२०२२)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |