द्वापरयुगात श्रीकृष्‍णाने गोवर्धन पर्वत उचलून सामान्‍य जनतेचे रक्षण करणे आणि कलियुगात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधनेचा मार्ग दाखवून साधकांचे रक्षण करणे

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘आपत्‍काळ म्‍हणजे अनिष्‍ट शक्‍तींचे साधकांना त्रास, म्‍हणजेच समष्‍टीला त्रास देण्‍याचे नियोजन ! समष्‍टीतील सामान्‍य जनतेला त्रास झाला की, त्‍याचा त्रास चांगल्‍या लोकांना, म्‍हणजेच साधकांना होतो.

१. इंद्रदेवाला यज्ञाचा हविर्भाग मिळत नसल्‍याने तो पर्जन्‍यवृष्‍टी करून गोपाळांना त्रास देऊ लागल्‍यावर श्रीकृष्‍णाने गोपाळांना गोवर्धन पर्वताच्‍या छायेखाली घेऊन त्‍यांचे रक्षण करणे

श्री. नंदकिशोर नारकर

द्वापरयुगात द्वारकेतील जनता इंद्राला यज्ञाचा हविर्भाग अर्पण करत असे. त्‍यामुळे इंद्राचा अहंकार वाढला. तेव्‍हा श्रीकृष्‍णाने गोपाळांना सांगितले, ‘‘इंद्रदेवाला यज्ञाचा हविर्भाग देऊ नका.’’ त्‍यामुळे कुणीही इंद्रदेवाला यज्ञाचा हविर्भाग देईनासे झाले. त्‍यामुळे इंद्रदेवाला राग आला. तो पर्जन्‍यवृष्‍टी करून सर्व गोपाळांना त्रास देऊ लागला. तेव्‍हा सर्व गोपाळ श्रीकृष्‍णाला शरण जाऊन प्रार्थना करू लागले. त्‍या वेळी श्रीकृष्‍णाने त्‍यांना गोवर्धन पर्वताच्‍या छायेखाली घेऊन त्‍यांचे रक्षण केले.

२. अनिष्‍ट शक्‍तींच्‍या कारवायांमुळे यज्ञयाग होत नसल्‍याने यज्ञयागाच्‍या माध्‍यमातून वातावरणाची होत असलेली शुद्धी थांबणे आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधनेचा मार्ग दाखवून साधकांचे रक्षण करणे

कलियुगात अधर्मींनी यज्ञाविषयी पुष्‍कळ अपप्रचार करून सामान्‍य जनतेला त्‍याच्‍या लाभापासून वंचित ठेवले. अनिष्‍ट शक्‍तींनी अधर्मी लोकांच्‍या माध्‍यमातून यज्ञयाग करण्‍यावर बंदी आणली. तेव्‍हा यज्ञयागामुळे वातावरणाची होत असलेली शुद्धी थांबली. रोगराईने विक्राळ स्‍वरूप घेऊन त्रास देण्‍यास आरंभ केला. तेव्‍हा सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी या त्रासाच्‍या निवारणार्थ साधनेचा मार्ग दाखवून साधकांचे रक्षण केले.’

– श्री. नंदकिशोर दत्तात्रेय नारकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.७.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक