ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना ‘ब्राह्मणभूषण’ पुरस्कार घोषित !
पुणे – ‘आम्ही सारे ब्राह्मण’ आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका या नियतकालिकांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘ब्राह्मणभूषण’ पुरस्कार सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना ६ मे या दिवशी पुणे येथे देण्यात येणार आहे, अशी माहिती नियतकालिकांचे मुख्य संपादक भालचंद्र कुलकर्णी आणि संचालक संजय ओर्पे यांनी दिली. व्यावसायिक नाटकांच्या १२ सहस्र ५०० हून अधिक प्रयोगांचा टप्पा पार केलेले विश्वविक्रमवीर अभिनेते प्रशांत दामले यांना नुकताच संगीत नाटक अकादमीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला असून टिळक महाराष्ट्र विद्यापिठाकडून त्यांना डी.लिट पदवी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार घोषित केल्याचे सांगण्यात आले. मानपत्र, पुणेरी पगडी आणि उपरणे असे पुरस्काराचे स्वरूप आहे.