माझ्या हत्येचा तिसर्यांदा कट रचला जात असल्याने माझ्यावरील सर्व खटले रहित करा !
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची मागणी
लाहोर (पाकिस्तान) – मला मारण्याचा तिसर्यांदा कट रचला जात आहे. माझ्यावर चालू असलेले सर्व राजकीय खटले रहित करावेत, जेणेकरून मला पुनःपुन्हा न्यायालयात ये-जा करण्याची आवश्यकता भासणार नाही, असे विधान पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केले. त्यांना २ मे या दिवशी येथील उच्च न्यायालयात आणण्यात आले होते. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते. इम्रान खान यांच्यावर देशभरातील विविध शहरांमध्ये जवळपास १२१ खटले चालू आहेत. यामध्ये देशद्रोह, देवतांचा अवमान, हिंसा भडकावणे, आतंकवाद पसरवणे अशा अनेक प्रकरणांचा समावेश आहे. इम्रान यांच्या म्हणण्यानुसार हे सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असून ते फेटाळले जावेत.